मंगळवार, २४ फेब्रुवारी, २००९

MaraathiMhani

माझ्या आजीने / बाबानी सांगितलेल्या म्हणी ह्या तुम्हाला मराठीच्या पाठ्य पुस्तकात कधीच सापडणार नाही।
तुमचा तुम्ही अर्थ लावा आणि रोज वापरा ..... अजुन तुम्हाला माहीत असतील तर मला सांगा

- सांगायला सांगितले की टांगयाला न्यायचे -
- कावळा कारभारी गु दरबारी
- निस्काच्या गा**त घातला पाला गार लागतोय आणखीन घाला
- महाराजांची निघाली सवारी अन् मशालाजीचा घातवार
- भले भले भागले अन् पादरे नाचू लागले
- दिवस गेला रेटारेटी चांदण्या रात्री कापूस वाती
- बाई भीड़ेची गाव टग्यांचे
- सात साडया नेसल्या तरी भागुबाईचे कुल्ले उघडेच
- तरण्या झाल्या बरण्या अन म्हातार्या झाल्या हरण्या
- शिन्क्याचे तुटले अन बोक्याचे फावले
- उघडयाशेजारी नागडे आले अन थंडीने काकडून मेले
- बाप जेऊ घालिना अन भाऊ भीक मागू देईना
- करीन म्हटले डोरले तर सोनाराचे डोके फिरले
- गाढवं अशी जर गूळ हगली असती तर डोम्बारी कशाला भिक मागत हिंडले असते
- तोंडी तिळ की गा ** ला बुधला
- एक हात लाकुड अन बारा हात ढलपी
- ताकाला जाउन भांडे कशाला लापवायाचे ?
- शिकार निकले तो कुत्तेको पैखाना
- इनिस्पेक्षनच्या दिवशी मास्तर गैरहजर
- मोरीला बोळा अन दरवाजा उघडा
- कुठे जाशील भोगा तर तुझ्या पुढे उभा
- आपण सांगे लोकांला शेम्बुड आपल्या नाकाला
- गावाची लग्ने आणि कुत्र्यांच्या ताराम्बळी
- बाजारात तुरी आणि भट भट्णीला मारी
- कुणाला कशाचे तर बलत्याला पशाचे
- सटवाईंला न्हाई नवरा अन म्हासोबाला
न्हाई बायको
- होला एवढा जीव अन हत्तीच्या गा*चा मुका घेतोय